सामाजिक बदलासाठी जनवकालतीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे सामाजिक अभ्यास.
प्रगती अभियानने अनुभव व अभ्यास आधारित अॅडव्होकसीवर भर दिला आहे. गरिबीची
समस्या, तिच्या निर्मूलनाचे विविध पर्याय पुढे आणणारे विविध सामाजिक अभ्यास
संस्थेने हाती घेतले आहेत.
यातील काही महत्त्वपूर्ण अभ्यास विषय पुढीलप्रमाणे -
युनिव्हर्सिटी आॅफ ब्रिटीश कोलंबिया, व्हॅन्कुव्हर, कॅनडा यांच्या समवेत प्रगती अभियान
अभ्यास करत असून त्याचे शीर्षक पुढीलप्रमाणे - ‘Institutions and Social Capital
in the Process of Development’.
विकास प्रक्रियेत सामाजिक भांडवलाची भूमिका जाणून घेणे हा या अभ्यासाचा हेतू आहे.
याकरिता महाराष्ट्रातल्या ३०० गावातील ९००० ग्रामीण कुटुंबांचे माहिती संकलन केले
आहे.
Read More
राज्यातील रोहयो अधिक सक्षम व्हावी या हेतूने प्रगती अभियानने विविध अभ्यास हाती
घेतले आहेत. यातील काही अभ्यास संस्था स्वतंत्रपणे करत आहे तर काही राज्य
सरकारसोबत करत आहे.
रोहयोबाबतच्या चर्चेत पुढे येणाऱ्या दोन ठळक भूमिका आहेत. एक अशी, रोहयो म्हणजे
बोगस कामगार, खोट्य़ा नोंदी आणि साराच भ्रष्टाचार; आणि दुसरी, प्रशासकीय़
दिरंगाईकडे बोट दाखवणारी. यंत्रणेच्या सुस्तपणामुळे काम वेळेत सुरू होत नाही, मजुरी
उशीरा मिळते, पुरेसे दिवस कामच उपलब्ध होत नाही.
काही जण रोहयोमुळे शेतीकामाला मजूर मिळत नाहीत असेही म्हणतात. शेतमजुरीचे
दर वाढले, मजुरांचा तुटवडा आला आणि स्थलांतर यावर बोलले जाते. तर या मुद्द्यांचा
प्रतिवाद करणाऱ्यांकडून रोहयोची गरज, योजनेचे महत्त्व, त्यातून स्थानिक पातळीवर
तयार झालेली संसाधने अशा सकारात्मक गोष्टींकडे लक्ष वेधले जात आहे.
रोहयो यंत्रणेचा कारभार आणि योजनेच्या अंमलबजावणीचे परिणाम या दोन ठळक
परिप्रेक्ष्यामध्ये प्रगती अभियान योजनेचे विविध पैलू तपासून अभ्यासातून पुढे आणणार
आहे. त्यामुळे अभ्यासातील पहिला भाग अंमलबजावणी यंत्रणेच्या कारभारासंबंधी आहे
व दुसरा भाग योजनेचे परिणाम समजून घेण्यासाठी आहे.
<
This study is in process.
Read More