दशकाचा प्रवास उलगडताना

कृपया लक्षात घ्यावे - आमच्या संस्थेतर्फे कोणत्याही प्रकारची फी घेउन, परिक्षा घेउन नोकरीची आशा दिली जात नाही. अश्या पध्दतीचे आपण काही शोधत आसाल तर ते इथे नाही, संबंधीत कोणत्याही प्रकारची चौकशी फोन वा मेलवरुन करु नये.

शिर्षक : "नरेगाची साथ दाखवी प्रगतीची वाट!"

Part 15: On Air Dated 5th April 2017

Download

नवीन दिशा-ऊर्जा मिळेल काय? (अश्विनी कुलकर्णी) अश्विनी कुलकर्णी | Aug 24,2016 2:28 AM IST

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी नवी आशादायी पहाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही शासकीय योजनांबद्दल आपण सर्वसामान्य नागरिक फारसे उत्साही नसतो. त्यामुळे ‘आशादायी पहाट’ वगैरे वर्णनात खूप अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता आहे. पण काही अटींची पूर्तता करण्याची राजकीय इच्छाशक्ती जर राज्य सरकार दाखवणार असेल तर नजीकच्या काळात राज्यात ग्रामीण विकासाच्या पहाटेची सुरुवात होऊ शकेल.

अंमलबजावणी हे कामाचे गमक आहे


ग्रामीण गरिबी दूर करणे हे प्रगती अभियानचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी संस्था ग्रामीण गरिबांसोबत २००५ पासून काम करत अाहे. गरिबीच्या काचातून बाहेर पडण्यासाठीचे पर्याय त्यांच्या सहभागाने व साथीने शोधणे असे या कामाचे स्वरूप आहे.

गरिबांना अापल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहाय्य करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. आपल्या राज्यघटनेने लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिलेला आहे. त्याची पूर्तता होण्यासाठी हाताला काम पाहिजे, पोटाला अन्न पाहिजे, आरोग्य-शिक्षण-निवारा यांचीही हमी पाहिजे. या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणे आणि त्यासाठी आवश्यक धोरणे व योजना करणे आणि त्यांची चोख अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

यादृष्टीने आणलेल्या रोजगार हमी कायदा, रेशन व अन्य सुविधा व योजना सामान्य लोकांना उपयोगाच्या आहेत. पण या योजना जितक्या चांगल्या आहेत तितकी त्यांची अंमलबजावणी चांगली व परिणामकारक नाही. ती सुधारण्यासाठी प्रगती अभियान प्रयत्नशील आहे. शासकीय योजना व कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत नेण्यापासून, सरकारी यंत्रणेला अंमलबजावणीतील अडसर दूर करायला मदत करण्यापर्यंत अनेकविध कामे संस्था करते आहे. प्रशिक्षण व कौशल्य विकासाचे काम करते आहे. यात आम्हाला अनेक समविचारी संस्थांची साथ मिळते आहे. राज्य व देश पातळीवरील नेटवर्कमधून अनुभवांची देवाण-घेवाण होत आहे. योजना, धोरणे कायद्यावर असून उपयोगाचे नाही, ती प्रत्यक्षात येणे महत्त्वाचे आहे. योजना राबवली गेली तरच लोकांच्या आयुष्यात फरक पडतो, म्हणूनच ‘अंमलबजावणी हेच कामाचे खरे गमक अाहे’ ही आमची धारणा अाहे.

“या स्वातंत्र्याने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे हे कदापिही विसरू नका. आपण स्वतंत्र झालो, म्हणजेच आता आपल्याला सगळ्या चुकांचे खापर ब्रिटीशांवर फोडता येणार नाही. यापुढे जर काही वावगे झाले तर त्याचा दोष सर्वार्थाने आपलाच असणार आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रगती अभियानचे कार्यकर्ते श्री . आनंद पगारे यांनी तयार केलेला व्हिडीओ

"काम मांगो अभियान"

7 दिवस आणि 70 प्रश्न

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या सोनाळे गावात मी एक आठवडा काम करण्यासाठी गेलो. पाणलोट विकासाचं काम होतं. ‘पाणलोट’ हा शब्द खूपदा ऐकलेला होता.

पण तिथं गेल्यावर या शब्दाचे नवे पैलू कळले. त्याहून महत्त्वाचं म्हणजे दुष्काळ, शेती आणि खेडय़ातल्या इतरही समस्यांबद्दल डोळेच उघडले.
रविवार १६ ऑगस्ट २०१५