Publication : Books

तगण्यापासून जगण्यापर्यंत...

या कथा आहेत पूर्णत: वास्तविक जगातल्या. त्यांचे लेखक आहेत प्रगती अभियानचे कार्यकर्ते. नेहमी कार्यकर्ते लिखाण करतात ते रिपोर्टच्या माध्यमातून. त्यात फक्त आकडे असतात. पण या कथांमध्ये प्रगती अभियानच्या कार्यकर्त्यांनी त्या आकड्यांमागच्या माणसांच्या गोष्टी टिपल्यात. रोजगार हमीनं त्यांच्या जगण्यात, त्यांच्या गावात काय बदल आणला तो शब्दात मांडला. कार्यकर्त्यांना लिहितं करत, लोकांना बोलत करत साकारलेलं हे अनोखं पुस्तक.

ग्राम रोजगार सेवक – माहिती पुस्तिका

रोजगार हमी योजनेच्या अमलबजावणीत ग्राम रोजगार सेवक हा महत्त्वाचा दुवा. गरजू मजुराला काम मिळवून देणारा,

लहान शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था करणारा आणि गावासाठी विकासाचा रस्ता तयार करणारा. अशा

ग्रामरोजगारसेवकाचे हात बळकट करण्यासाठी त्याला कायद्याची माहिती, अमलबजावणीच्या पद्धती समजावून

सांगणारी ही पुस्तिका. यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना का आहे, त्याचं वेगळेपण काय, फायदे

काय, त्यासाठीची प्रशासकीय रचना कशी आहे, कोणती यंत्रणा काम करते, त्यात ग्रामरोजगार सेवकाची भुमिका काय,

त्याची कामं कोणती, ग्रामपंचायतींनी रोहयोचं काम करायचं, त्याचं मानधन कसं ठरतं याची तपशीलात माहिती आहे.

विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेशी संबंधित सर्व शासकीय आदेशांची माहितीही दिलीए. ग्रामरोजगारसेवकाला

उपयुक्त अशी ही मार्गदर्शक पुस्तिका.

डाळींब – तेल्या रोग आणि व्यवस्थापन

कोरडवाहू परिसरातल्या छोट्या शेतकऱ्याला गरिबीतून बाहेर काढणारं डाळींब हे पीक. डाळींब बागेच्या मदतीनं अनेक

लहान कोरडवाहू शेतकरी बागायतदार बनले. पण मर आणि तेल्या या रोगांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. शा

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी ही पुस्तिका. डाळींब तेल्या रोग – व्यवस्थापन आणि नियंत्रण. कृषी विद्यापातील

तज्ज्ञांनी आणि डाळींब शेती यशस्वी करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी लिहिलेले हे लेख इतर शेतकऱ्यांना नक्कीच

मार्गदर्शक, उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत.

मागून तर पाहा...!

गरिबी हटवण्यासाठी अनेक सरकारी योजना आल्या. वैयक्तिक लाभाच्या, सार्वजनिक हिताच्या, गावाच्या विकासाच्या.

पण काही ठिकाणी त्या कागदावरच राहिल्या तर काही ठिकाणी गैरव्यवहारात अडकल्या. याबाबत सामान्य जनता जेव्हा

न्याय मागण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना वाली कुणीच नसतो. भारतीय लोकशाहीनं या सामान्य माणसाच्या हातात

एक साधन दिलं ते माहिती अधिकाराचं. माहिती अधिकार कायदा नेमका काय आहे, तो कसा वापरायचा, का

वापरायचा याबाबत माहिती देणारी ही पुस्तिका. भारतातील प्रत्येक नागरिकाला सक्षम करणारी, विकासाची प्रक्रीया

पारदर्शक आणि गतीशील करणारी.

गरीबांचे चलन

भारतातील रेशन व्यवस्था ही गरिबांसाठीची जगातील सर्वात मोठी अन्नसुरक्षेची व्यवस्था आहे. ही व्यवस्था आज

कमालीच्या भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मोडकळीस आली आहे. या व्यवस्थेला पर्याय आहे तो स्मार्ट कार्डसचा

किंवा फूड स्टॅम्पचा. या पर्यायामुळे गरिबांना अन्नासाटीचे अनुदान थेटपणे आणि परिणामकाररित्या मिळेल आणि

देशातील धान्योत्पादक शेतकऱ्यांच्या मालालाही चांगले बाजारभाव मिळतील. असे दुहेरी परिणाम साधणाऱ्या या

पर्यायाविषयी ही पुस्तिका माहिती देते.

 

 

For Details about these Publication contact us at:-

Pragati Abhiyan Contact Details Office Address:
Pragati Abhiyan
Atharva, Ashwin duplex
Vishakha Colony, Rajivnagar
NASHIK 422 009
Phone : 91253 2370397

Or get in touch with us just by filling your information and queries at:

Contact Us